प्रेमपाश

– मानसी बोडस / कविता /

अलवार पाकळीच्या जाळ्यात तो अडकला,
गुणगुणत गाणे तयाने आनंद साजरा केला
सूर्यसाक्षीने मग बाहेर तो निघाला;
विसरणार तुला नाही कधी, म्हणाला!

ती पाकळी मग अशी उदासून गेली,
रवी किरणांचीही मिठी तिला नकोशी!
त्या भृंगशृंग रात्री, त्याचा स्पर्श हवासा;
मन त्यालाच शोधू पाही टाकून मंद उसासा!

पाऊस वाऱ्याला झेलून पार दमली;
पाकळी एकटी उदास, गळून मात्र गेली
तो खुशालचेंडू आला पुन्हा तिला भेटाया;
ती नाही म्हणून, बैचेन तोही झाला…

ह्या प्रेम म्हणावे का रे? गळताना ती विचारे;
त्यालाच भेटण्या का मन आतुर माझे झाले?
भृंगाला स्मरण झाले, आज त्या पाकळीचे,
महत्त्व पटेल त्याला कधी खऱ्या प्रेमाचे?

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here