मराठी साहित्यिक कै. वसंत पुरुषोत्तम काळे. लेखक, कथाकथनकार, अभियंता, व्हायोलिन-संवादिनी वादक आणि उत्तम फोटोग्राफर अशी वपुंची ओळख. सुंदर हस्ताक्षर, सुंदर रस्ता, सुंदर इमारती, सुंदर सजावट आणि मानाने सुंदर असणाऱ्या माणसांचे चाहते म्हणूनच त्यांच्या कथा ह्या मनावर सुंदर अशी स्मृती ठेऊन द्यायच्या.
त्यांच्या विनोदी कथांमध्ये सुद्धा सत्यतेची बाजू नेहमीच दाखविली जाते. विनोदी कथांमधून हसवता हसवता एक शल्य भिडत रहातं आणि चटका लावून जातं ही अशीच जीवनाची तऱ्हा आहे आणि अशाच सुंदर सोप्या कथांमधून त्यांनी वाचकांना मोहून सोडले.
मन, विचार, प्रेम, बावळटपणा यासारख्या गोष्टींना प्रत्यक्षात आकार वगैरे नाही किंवा त्या दाखवू शकत नाही पण वपुंनी त्यांचे वेगळेपण कायमच मांडले आपल्या लिखाणामधून भौतिकवाद व सत्यता अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टींबद्दल थेट हृदयाला लागेल इतकं खोलवर लिहीणं खूप कमी जणांना जमतं त्यातलेच वपु एक होते.
कोणतंही समर्थन मूळ दुःखाची हकालपट्टी करु शकत नाही. वर पट्टी बांधायची टी जखम झाकण्यासाठी. आत जखम आहे ती ज्याची त्याला ठसठसत असतेच. – व. पु. काळे