ठुमरी, गझल, सिनेसंगीत, लोकसंगीत, नाट्यगीत, भावगीत व अभंगात साथ करत असताना गीताच्या चालीला अनुसरुन तबला वादक चंचल प्रकृतीच्या तालात म्हणजे दादरा, कहरवा या तालात वेगवेगळ्या शैलीने आकर्षक रूप देऊन वाजविल्या जाणाऱ्या बोलसमूहास ‘लग्गी’ असे म्हणतात. तालाचा मूळ ठेका त्यानंतर उठान आणि त्यानंतर लग्गी घेऊन तिहाईने त्या त्या गीतप्रकाराचा शेवट होतो. लग्गीचे पल्टे बनविले जातात व ते मूळ ठेक्याच्या दुगुनीत वाजविले जातात.
उदाहरणार्थ : ताल कहरवा / केरवा
१) धातीं ताडा । तातीं धाडा ।
२) धाधिं धाधा । धातीं ताता ।
३) धातीं नानाकिन । ताधीं नानागिन ।
Advertisement