गीत : वसंत निनावे
संगीत : यशवंत देव
स्वर : रामदास कामत
हे आदिमा, हे अंतिमा
जे वांछिले ते तू दिले कल्पद्रुमा।।धृ।।
या मातीचे आकाश तू
शिशीरात या मधुमास तू
देशी मृता तू अमृता
पुरोषोत्तमा ।।१।।
देणे तुझे इतुके शिरी
झालो ऋणी जन्मांतरी
अपकार मी, अपराध मी
परि तू क्षमा ।।२।।