एकटे सोडून गेलीस तू…

– रोहन पिंपळे / कविता /

एकटे करुन आम्हाला
हे जग सोडून गेलीस तू
नेहमी हसत रहा असे शिकवत शिकवत
रडवून आम्हाला गेलीस तू

शेवटचे तरी एकदा मांडीवर डोके ठेऊन
शांतपणे झोपावे असे वाटते
तुझ्या गोष्टी ऐकत ऐकत
जवळ तुझ्या बसावे असे वाटते
सगळ्यांवर प्रेम करा असे सांगून गेलीस तू
एकटे करून आम्हाला हे जग सोडून गेलीस तू

दाखवत राहिलीस तू नेहमी
सगळ्यांना मार्ग जगण्याचा
सतत तुझा मानस होता
दुसऱ्यांना खुश बघण्याचा
कोणालाही न दुखवता दूर गेलीस तू
एकटे करून आम्हाला हे जग सोडून गेलीस तू

घरातल्या प्रत्येकाच्या मनावर
राज्य करत राहिलीस तू
आठवणींमध्ये सगळ्यांच्या ह्रुदयात
अनमोल हिरा बनून राहिलीस तू
सगळ्यांना भरपूर आईची माया देऊन गेलीस तू
एकटे करून आम्हाला हे जग सोडून गेलीस तू

तुझ्याबद्दल बोलण्यासाठी
हे शब्द पुरे पडणार नाहीत
तुझ्यासारखे व्यक्तिमत्व
परत कुठे घडणार नाही
तुझा वेगळाच ठसा उमटवून गेलीस तू
एकटे करून आम्हाला हे जग सोडून गेलीस तू

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version