कोरी पाटी

  • कल्पेश वेदक / कविता /

तू दिलेल्या जन्माचा 
ओसंडून वाहणाऱ्या ममतेचा
मी अखंड ऋणी आहे…

अवखळलेल्या चालीतून
एका मार्गावर आणून पोहचविण्याचा 
मी अखंड ऋणी आहे…

पण आता, हे आयुष्य असेच संपणार
गैरसमजूतीचे बिनशर्त करार
या विवरातून आजपर्यंत
कुणाचीच सुटका झाली नाही…

गैरसमज माझे झाले
माझ्याबद्दल इतरांचे झालेह
‘हे विश्वचि स्वार्थू तया कसला परमार्थु’…

कसलं काय आणि कसलं काय 
जे काही शिकलो 
ते अनुभवाने पुसायला लागलं
आणि पाटी कोरी ती कोरीच राहिली…

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version