लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
सुधाकर आणि मालिनी कराडच्या हॉस्पिटलमध्ये त्या बाळाला घेऊन आले. डॉ. साळुंखे यांना त्या बाळंत काहीतरी विलक्षण अशी शक्ती नजर आली. त्यामुळे त्यांनी त्या बालकावर बरेच प्रयोग करून पाहिले. अखेर आलोकला म्हणजे त्या बाळाला सुधाकर आणि मालिनी वाराणसीला घेऊन जाण्यास तयार झाले. जाताना डॉ. साळुंखे यांनी शुद्धकरला सांगितले की, आलोकची प्रगती मला वरचेवर कळवत राहा. तो जास्त हालचाल करत नसल्याने त्याची सर्व शक्ती मेंदूत एकवटली आहे. मुलांमध्ये वयोमानाप्रमाणे मेंदूची प्रगती होत असते. परंतु आलोकमध्ये एक विलक्षण शक्ती आहे असे डॉ. सुधाकरला म्हणाले.
त्यानंतर काही महिन्यांनी मालिनी आणि तिच्या मैत्रिणींपुढे आलोकने केलेल्या कृत्याबद्दल मालिनी सुधाकरला म्हणाली, आपला आलोक काही कृतीत मागे राहतो. म्हणजे इतर मुलं पटकन काही गोष्टी करायला पुढे होतात परंतु आलोक त्याच जागी बसून राहतो. त्यावर सुधाकरने मालिनीची समजूत घातली की, आलोक अजून ३ वर्षांचा आहे, अजून लहान आहे आणि काही मुलांची वाढ अशीच होत असते.
एकेदिवशी डॉ. साळुंखे वाराणसीला सुधाकरच्या घरी भेट देतात आणि अलोकसाठी एक खेळ आणतात जो वयाच्या ८व्या वर्षांपासून वयोवृद्धांपर्यंत खेळू शकतो. मालिनी आणि सुधाकरला पहिले आश्चर्य वाटले कारण आलोक ३ वर्षांचा असून साळुंख्यांनी त्याला मोठ्या वयाच्या मुलांची खेळणी आणली. त्यावर डॉ. साळुंखे म्हणाले की मी मुद्दाम असे खेळणे आणले आहे कारण मला त्याच्यात एक विलक्षण शक्ती दिसते. पुस्तकात दिलेल्या काही चित्रांवरून तिथे ठोकळे होते त्यावरून ते ठोकळ्यांनी चित्र बनवायचे होते. आलोकच्या वयात असणाऱ्या मुलांसाठी हा खेळ योग्यच नव्हता तरीसुद्धा डॉ. त्याच्यावर प्रयोग करू पाहत होते. त्याला तो खेळ देऊन, डॉ. शाळुंख्यानी सुधाकर आणि मालिनीला रुबिक क्यूब चा खेळ दिला. देताना त्यांनी दोघांना त्या खेळाविषयी सांगितले.
आलोक आपला खेळ संपवून डॉ. साळुंख्यांना विचारायला आला की त्याने केलेले ठोकळे बरोबर आहेत का? ते बघून होईपर्यंत आलोकने सुधाकर आणि मालिनीच्या हातातील रुबिक क्यूब घेऊन स्वतः तो एकाच रंगांच्या बाजूत आणून त्यांना क्षणार्धात दिला होता. हे पाहून ते तीन प्रौढ त्या छोट्या बाळाकडे बघत बसले होते.