स्वतंत्र तबला वादनातील अत्यंत महत्त्वाचा वादनप्रकार म्हणजे ‘पेशकार’ होय. हा फारसी शब्द आहे. याचा अर्थ पेश करणे म्हणजेच सादर करणे असा होतो.
स्वतंत्र वादन करताना विलंबित लयीत उठान वाजवून पेशकार वाजविला जातो. ठेक्यातील अक्षरे, खंड तथा रचनेशी जवळीक साधणारी किंबहुना त्यातून निर्माण झालेली खाली-भरी या मुक्त व कलात्मक प्रयोग केली जाणारी, प्रथम एकाच गतीत नंतर विविध शब्द लयाकृतिबंधांना जन्म देणारी विस्तारक्षम रचना म्हणजे ‘पेशकार’.
पेशकार सादर करत असताना वादकाला अनेक लयीत वाजविण्याचे स्वातंत्र्य असते व त्याच्या प्रतिक्रिया व कल्पनाशक्तीला वाव असतो. दिल्ली व फारुखाबाद घराण्याचे पेशकार स्वतंत्र तबला वादनात प्रामुख्याने दिसून येतात.
उदाहरण :
धिंsक्ड धिंधा sधा धिंधा धाती धाती धाधा धिंधा
तक घिडाsन् धातूंना धा धाक्ड धाती धाधा धिंधा
किडनग तिंना किडनग तिन् तिनाकिन ताके तिरकिट ताके तिन् तिनाकिना
तक घिडाsन् धातूंना धा धाक्ड धाती धाधा धिंधा
Thank you