गत

तालावर्तनांत विविध लयकारीने वाजविल्या जाणाऱ्या आकर्षक बोलरचनांना ‘गत’ असे म्हणतात. ‘गत’ म्हणजे तबल्याच्या भाषेतील एक काव्यरचना होय. स्वतंत्र तबलावादनात गत, गतपरन, गतकायदा अशा अनेक बंदिशींना महत्त्वाचे स्थान आहे.
निसर्गातील विविध हालचालींवरून गतींची निर्मिती केली जाते. गतीच्या रचनेतून कलावंतांची कल्पकता, प्रतिभा व वादनकौशल्याचे दर्शन घडते. लयकारी, मुलायमता, वैशिष्ट्यपूर्ण सुंदर बोलांची बांधणी असून त्यात तिहाई असते.

गतीचे प्रकार : चक्रदार गत, फर्माईशी चक्रदार गत, कमाली चक्रदार गत, त्रिपल्ली, चौपल्ली गत, गेंदउछाल गत, मंझदार गत, रेला गत.

उदाहरण : ताल त्रिताल

दिंsग दिंsग ता
तागेन तागेन ता
धात्रक धिकीट कता गिदीत्ताsन
धातीं कत कत धा – त्रक धेत्त तागीन्न धा
घेघे नाना कत sधिं धिं धा ।। धा

Latest articles

Related articles

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!