- – सविता टिळक
अचानक कोसळला संकटांचा पाऊस
अज्ञाताच्या ओझ्याखाली गुदमरला श्वास
अनोख्या भीतीने मनांमध्ये काहूर
प्रत्येक दिवशी मृत्यूचा संहार
दु:खावेगाने गाली ओघळली आसवे
शोकाच्या धगीत सुकून गेली
थिजल्या डोळ्यांत स्वप्ने विरली
दु:खाचे हे पाश कसे तुटावे?
झटले अहोरात्र योद्धे अनेक
झुंजले जिद्दीने संकटांशी
ओघळले अनमोल मोती कित्येक
देऊन प्राणदान बहुतांसी
कुठूनशी आली जीवनाची साद
घुमला कानी चैतन्याचा नाद
उठला मानव झुगारून भय सारे
अंधाराचे फिटून गेले जाळे
जागली आस नव्या आकांक्षांची
नव तेजाची आभा पसरे आकाशी
तरळती नयनी स्वप्ने नव्या उद्याची
मना दिसती शिखरे नवी यशाची
Advertisement