मराठी भाषेतील प्रसिद्ध कवी कै. विश्वनाथ वामन बापट वसंत बापट. लहानपणापासून वसंत बापट यांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि सानेगुरूजींच्या सहवासाचे संस्कार झाले. ‘बिजली’ या पहिल्या काव्यसंग्रहावर त्यांच्या घडल्या गेलेल्या संस्काराचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. ‘अकरावी दिशा’, ‘सकीना’ आणि ‘मानसी’ हे त्यांचे बिजली नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या.
पौराणिक ऐतिहासिक कथानकांवरची त्यांची नृत्यनाट्येही प्रभावी ठरली ‘केवळ माझा सह्यकडा’ ही त्यांची कविता सर्वतोमुखी झाली. ‘गगन सदन तेजोमय’ सारखे अप्रतिम प्रार्थनागीत त्यांनी लिहिले. कालिदासाच्या विरही यक्षाची व्याकुळता त्यांनी मेघहृदयाच्या रूपाने मराठीत आणली. त्यांची सकीना उर्दूचा खास लहेजा होऊन प्रकटली आणि ‘तुला न ठेवील सदा सलामत जर या मालिक दुनियेचा, कसा सकीना यकीन यावा कमाल त्यांच्या किमयेचा, सांगून गेली.
निर्भीड बाणेदारपणा हा वसंत बापट यांचा एक गुण असला तरी त्यापेक्षाही त्यांची साहित्य सेवा अधिक स्मरणात राहण्यासारखी आहे. त्यांना साहित्यिक आणि साहित्याची अवहेलना केलेली अजिबात आवडत नसे. मराठीत रविकिरण मंडळानंतर काव्यवाचनाची आवड लोकांत ज्यांनी निर्माण केली त्यात विं. दा. करंदीकर आणि मंगेश पाडगांवकर यांच्या बरोबर वसंत बापट यांचा वाटाही मोलाचा आहे.
Home Literature Marathi महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारसाची जपणूक करणारे रसिक मनाचे अस्सल मराठमोळे व्यक्तिमत्व कविराज वसंत...