~ सविता टिळक / कविता
असतं प्रत्येकाचं आपलं एक आकाश
रमण्यासाठी जणू मुक्त अंगणाचं आवार
नसतात तिथे जबाबदाऱ्यांची ओझी अन् अपेक्षांची बंधनं
फुलतं या आकाशात स्वप्नांचं मोहकसं चांदणं
अडकून पडता जबाबदाऱ्यांच्या ओझ्यांत
आकाश धूसरते चिंतांच्या झाकोळात
पेलताना अपेक्षांची बंधने
निस्तेज होते स्वप्नांचे चांदणे
पेलून जबाबदाऱ्या समर्थपणे
मानावी प्रेमळ बंधने सहजतेने
सांभाळावे आपले स्वत:चे आकाश
जपावे स्वप्नांचे चांदणे मनात
शोधत जावे स्वतःचे नवे मार्ग
करावे काबीज प्रकाशाचे शिखर
Advertisement