।।श्रीराम।।
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ।।
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमूं पंथ आनंत या राघवाचा ।।१।।
अर्थ : जो गणपती सर्व लोकांचा ईश्वर व सर्व सद्गुणांनी नटलेला आहे, जो अनादी आहे, अनंत आहे.
जो असंख्य गुणांनी युक्त आहे व जी शारदा चार वाणींची जननी आहे अशा दैवतांस नमस्कार करुया व श्री रामरायांच्या मार्गाने जीवनाची वाटचाल करुया.
जय जय रघुवीर समर्थ…