देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी ।
मना सज्जना हेचि क्रिया धारावी ।।
मना चंदनाचेपरी त्वां झिजावें ।
परी अंतरीं सज्जना निववावें ।।८।।
हे सज्जन मना, तू जन्मभर काया, वाचा, मनाने असा वाग की, आपल्या मृत्यूनंतर लोक आपली कीर्ती गातील. त्यासाठी तू चंदनाचा आदर्श ठेव. चंदन ज्याप्रमाणे परमेश्वराच्या पूजेसाठी सहाणेवर झिजून घेते. त्यामुळे देव, सज्जन यांची पूजा होते व सुगंधाने वातावरण आनंदित होते. तुझे आचरण देहाला कष्ट करून सज्जनांना संतोष देणारे असावे.
Advertisement