नकळत सारे घडले

0
797

– सुनीता गोरे / कविता /

नकळत सारे घडले ।
कोरोनाचे चक्रीवादळ आले ।।१।।

महासत्ताधीशही चक्रावले ।
सारे जग भयभीत झाले ।।२।।

दुर्बिणीतूनही कोरोना दिसेना ।
कोणालाही उपाय सुचेना ।।३।।

नियतीचा हा अगाध महिमा ।
नच कळला तो मानवाला ।।४।।

रोज ऐकता विविध बातम्या ।
सर्वांच्या मनी दाटल्या यातना ।।५।।

ईश्वरी संकेतच असती महान ।
निष्प्रभ झाले शास्त्रज्ञांचे ज्ञान ।।६।।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here