भारतीय शास्त्रीय संगीतातील भरतनाट्यम् नृत्यशैलीचा जगभरात प्रसार करणाऱ्या गुरु श्रीमती अर्चना पालेकर

0
1258

भारतीय शास्त्रीय संगीतातील भरतनाट्यम् नृत्यशैलीचा जगभरात प्रसार करणाऱ्या गुरु श्रीमती अर्चना पालेकर. वयाच्या ६ व्या वर्षापासून त्यांनी त्यांच्या गुरूकडून म्हणजेच रमेश पुरव यांजकडून भरतनाट्यम् नृत्यशैली व लोकनृत्य शिकण्यास आरंभ केला. भरतनाट्यम् शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सुप्रसिद्ध कवी प्रा. वसंत बापट यांच्या भारत दर्शन कार्यक्रमासाठी राष्ट्रसेवादलमधून संपूर्ण भारतभर कार्यक्रम केले. अजब न्याय वर्तुळाचा या विजया मेहता व फ्रीट्झ निटिव्हिट्स दिग्दर्शित आणि साहित्य संघ निर्मित नाटकांतून प्रमुख नर्तकी म्हणून काम केले.

आपल्या हसतमुख, उत्साही आणि मृदू स्वभावाने त्यांनी आजपर्यंत हजारो विद्यार्थिनींना भरतनाट्यम् व लोककलेचे शिक्षण दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई, ठाणे, पुणे येथे भरतनाट्यम् प्रशिक्षणाचे कार्य ‘नृत्यकला निकेतन’ या संस्थेअंतर्गत चालू आहे. आपल्या विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास व्हावा याकरिता त्या सतत झटत असतात. हा त्यांचा ध्यास व उत्साही, अथक परिश्रम करण्याची वृत्ती यामुळे त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सर्वाना आत्मविश्वास मिळतो व ते विशिष्ट काम पूर्णत्वास अगदी सहजतेने नेले जाते.

गुरु श्रीमती अर्चना पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नृत्य निकेतन संस्थेतील विद्यार्थीनी देशभरातील निरनिराळ्या नृत्य उपक्रमांमधून आपली कला सादर करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी सतत ३ वर्षे तामिळनाडू राज्यातील चिदंबरम या ठिकाणी जागतिक ख्यातीच्या ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये आपली नृत्यकला सादर केली आहे.
पुरस्कार –
नृत्यशिरोमणी – केरळ सरकार (२००६)
नृत्यरत्न – ओरिसा सरकार (२०१०)
गिरगांव भूषण – मुंबई (२०१२)
मुंबई महापौर पुरस्कार (२०१३)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here