गुरूमहिमा

– सविता टिळक / कविता /

जीवनसमर जिंकावे कसे, चिंता मानवासी।
गुरूकृपेविना होईल का कोणी, प्राप्त विजयासी।

जीवनसागरात वादळे दु:खाची उठती।
गुरू नाम बळे नौका पैलतीर गाठती।

अढळ विश्वास गुरूंवर ज्याचा।
तो करी पार पर्वत आव्हानांचा।

जीवनाची अवघड, बिकट वाट चढणीची।
होई सहज पार, लाभता साथ गुरूंची।

जे गुरूनाम जपती नित्य अंतरी।
बरसती जीवनी त्यांच्या अखंड सुखसरी।

होता ह‌द्यी गुरूश्रद्धेचा रुजवा।
लाभे त्यास निरंतर आनंदाचा ठेवा।

करता सर्वस्व अर्पण गुरू चरणांवर।
सहज लाभे भक्ता मोक्ष, मुक्तीचे द्वार।

अर्थ : ह‌द्यी – हृदयी

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here