– तेजस सतिश वेदक / कविता /
क ने तर करामतच केली, कोरोना नामक विषाणूंची निर्मिती केली.
ख ने तर खबरदारी घ्यायचे ठरवले.
ग तर पूर्ण गांगरून गेला, गर्दी करणाऱ्यांना समजावू लागला.
घ ने तर मनावरच घेतले, घरातून बाहेर पडणार नाही हे ठाम ठरवले.
च ची तर झोप उडाली, एक चूक महाग पडेल हे त्यालाही पटले.
छ ने तर छोट्यांपासून मोठ्यांपर्यंतचे छप्परच काढले होते.
ज ने प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करून दिली.
झ ने झटापटीने कार्य चालूच ठेवले, डॉक्टर, पोलिसांनी स्वतःला झोकून दिले.
ट ने तर व्हॉट्सऍप्प वरून टिंगल चालू केली.
ठ ने ठोस निर्णय घेतले, बाहेर पडलात तर कारवाई, असे ठणकावून सांगितले.
ड ने तर देशाची अर्थव्यवस्था डगमगवली.
ढ च्या ढसाढसा रडण्याने सर्व वातावरण ढवळले.
ण ने तर आणीबाणीजन्य परिस्थिती निर्माण केली.
त ने शासनाची तारांबळ उडवली.
थ ने थांबवलं होतं सारे जग थरकाप उडाला आहे साऱ्या जगाचा.
द ची तर दमछाक झाली होती.
ध ची धावपळ सुरूच आहे पण धीर त्याने सोडला नाही.
न ने तर नकारात्मकता पसरवली होती.
प ने परीक्षा रद्द केल्या.
फ ने तर अनेकांची फसवणूकच केली.
ब ने तर अनेकांना बेरोजगार केले.
भ ने तर भाजीपाला स्वछ धुवून घ्यायला सांगितला.
म ने तर मनोरंजक कार्यक्रम चालू केले.
य तर वाट बघत आहे कोरोनवर मात करणाऱ्या यशाची.
र ने तर बायकांसाठी नवीन रेसिपीचा उच्छाद मांडला होता.
ल तर त्याच्या लसीचा शोध अजून घेत आहे.
व तर घो घो करत वादळ घेऊन आला होता.
श ने तर ऑनलाईन शाळाच उघडली.
ष तर राजकारणाच्या षडयंत्रात सहभागी झाला होता.
स ने सकस आहारास प्राधान्य द्यायचे ठरवले.
ह ने हात निर्जंतु करण्याचे काम हाती घेतले.
ळ ने तर बाळांची काळजी घ्यायला सांगितली.
क्ष ने शिक्षणाच्या जोरावर क्षत्रियासारखे लढण्याचे ठरवले.
ज्ञ ने ज्ञान वाढवून कोरोनाबाबतचे गैरसमज दूर केले.