लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
मॅकार्थीला एका लहानशा उपकरणातून सिग्नल मिळाला… पन्नास यार्डाच्या परिसरात जर एखादी magnetic टेप असेल तर तिचे अस्तित्व त्या उपकरणावर कळत असे. लगेच त्याने गेटवर पहारेकऱ्यांना विचारले की कुणी गेटमधून बाहेर किंवा आत आलं का. पहारेकरी म्हणाले की, जॉन प्रिंगल ड्यूटी संपवून गेले.
मॅकार्थीला संशय आला. लबाड वैज्ञानिक जॉन प्रिंगल काहीतरी गुप्त कारस्थान करतोय. सायक्लोप्सवर संदेश टेप करून बाहेर घेऊन जातोय. जॉन प्रिंगलने कॉम्प्युटर मधली सर्व माहिती अनधिकृतपणे आपल्याकडे घेतली होती. सायक्लोप्सच्या सर्व दुर्बिणी पूर्ववत आणून व्हिडिओ टेप एका पेटीत ठेऊन गेटबाहेर पडला होता. जॉन प्रिंगल आणि पिटर लॉरी यांचा काहीतरी कट शिजतोय याची शंका मॅकार्थीला आली. पिटर समाजवादी मताचा आहे, मॉस्कोचा एजंट असणार.
प्रिंगलने पिटर ला एका विशिष्ट ठिकाणी बोलावून घेतले.. गाडीत त्याने पिटर बरोबर केलेल्या सर्व कामाचे दिवस आठवले. पण गाडी चालवत असताना त्याने एक नियम मोडला. दृष्टी रस्त्यावर न ठेवता आजूबाजूला बघत, विचार करत गाडी चालवत राहिला आणि गाडी सकट खोल दरीत जाऊन मरण पावला.