विनोदी मराठी अभिनेता, नाटककार, निर्माता, दिग्दर्शक या विविध कला गुणांनी ज्यांनी मालवणी बोली मराठी भाषेत लोकप्रिय केली ते स्व. मच्छिंद्र कांबळी.
त्यांनी सुरू केलेल्या भद्रकाली निर्मितीच्या वस्त्रहरण नाटकाचे ५२२५ यशस्वी प्रयोग झाले आहेत. कांबळी यांच्या अभिनयामुळे गाजलेल्या या नाटकाने केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही नावलौकिक मिळविला. हे नाटक लंडनमध्ये सादर करण्यात आलं. विशेष म्हणजे सातासमुद्रापार सादर होणाऱ्या पहिल्या मालवणी नाटकाचा मान ‘वस्त्रहरणा’ला मिळालं.
‘पांडगो इलो रे’ , ‘घास रे रामा’ , ‘वय वर्ष पंचावन्न’ , ‘भैय्या हातपाय पसरी’, ‘येवा कोकण आपलाच असा’, ‘माझा पती छत्रीपती’ अशी अनेक नाटके त्यांनी आपल्या भद्रकाली प्रोडक्शन या नाटयसंस्थेमार्फत अनेक वर्ष चालवली.
Advertisement