ऐतिहासिक विषय सरळ सोप्या भाषेत लिहून वाचकांना खिळवून ठेवणारे कादंबरीकार रणजित देसाई

मराठी भाषेतील सुप्रसिद्ध कादंबरीकार स्व. रणजित देसाई. ऐतिहासिक विषयावर लेखन करणाऱ्या लेखकांमध्ये रणजित देसाई यांचे नाव सर्वात अग्रस्थानी आहे. त्यांच्या लेखनाची सुरुवात त्यांनी स्वतः अनुभवलेल्या ग्रामजीवनापासून केली. त्यानंतर त्याने आपले लेखन ऐतिहासिक विषयांवर केंद्रित केले. ज्येष्ठ कादंबरीकार हरी नारायण आपटे यांच्यानंतर इतिहास विषय इतका सहज व सोप्या शब्दांत वाचकांसमोर रणजित देसाई यांनीच आणून ठेवला.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कादंबरी ‘श्रीमान योगी’ व थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील कादंबरी ‘स्वामी’ या दोन्ही कादंबऱ्या मराठी वाचकांच्या मनात अगदी कोरल्या गेल्या आहेत. याशिवाय रणजित देसाईंची ‘पावनखिंड’ ही आणखी एक ऐतिहासिक कादंबरी. त्यांची ‘राधेय’ ही कर्णावरची कादंबरीही लोकप्रिय आहे. राजा रविवर्मा या श्रेष्ठ भारतीय चित्रकारावरील चरित्रात्मक कादंबरी आवर्जून वाचण्यासारखी आहे.

रणजित देसाईंनी फक्त ऐतिहासिक साहित्य लिहिले असे नाही. ग्रामीण साहित्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. सवाल माझा ऐका, रंगल्या रात्री या गाजलेल्या चित्रपटांच्या कथाही त्यांनीच लिहिल्या. त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरविण्यात आले. १९७३ मध्ये पद्मश्री देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या स्वामी कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. १९९० मध्ये त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here