नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे ।
अति स्वार्थबुद्धी न रे पाप सांचे ।।
घडे भोगणे पाप तें कर्म खोंटें ।
न होता मनासारिखें दुःख मोठे ।।९।।
मना.. दुसऱ्यांचे, स्वतःच्या कष्टाने न मिळविलेल्या द्रव्याविषयी, संपत्ती विषयी अभिलाषा धरु नये. त्यामुळे लोभ वाढतो व पापसंचय होत जातो. आपल्या हातून पाप घडते. शिवाय लोभी वृत्तीमुळे मन तृप्त होत नाही व जीवन खूप दुःखी होते.
Advertisement