आंतरराष्ट्रीय सामाजिक निरीक्षक व समीक्षक तसेच मराठी भाषेतील लेखक, पत्रकार अरुण साधू. १९७९ व्या वर्षी प्रदर्शित झालेल्या सिंहासन व २००० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर या चित्रपटांचे ते लेखक होते.
मराठीसह इंग्रजी पत्रकारितेत अमूल्य योगदान देणाऱ्या अरुण साधू यांनी मराठी साहित्यातही अफाट मुशाफिरी केली. कथा, कादंबरी, ललित, चरित्र, वैचारिक लेखन, भाषांतर अशा साहित्याचे विविध प्रकार हाताळत, प्रत्येक प्रांतात त्यांनी आपल्या लेखनाची छाप पाडली.
Advertisement