विख्यात मराठी कवी यशवंत

मराठी भाषेचे विख्यात कवी कै. यशवंत दिनकर पेंढारकर. कवी साधुदास (गोपाळ गोविंद मुजुमदार) हयांचे काव्यरचनेसंबंधीचे मार्गदर्शन आरंभीच्या काळात त्यांना मिळाले. यशवंतांची मूळ प्रवृत्ती राष्ट्रीय स्वरूपाची कविता लिहीण्याकडे होती. पुढे रविकिरण मंडळात ते आल्यानंतर इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवितेचा प्रभाव त्यांच्यावर पडला. यशोधन (१९२९) हा त्यांचा पहिला मोठा आणि लोकप्रिय असा कवितासंग्रह.

त्यानंतरचे त्यांचे यशोगन्ध (१९३४), यशोनिधी (१९४१), शोगिरी(१९४४), ओजस्विनी (१९४६), इ. काव्यसंग्रह प्रसिदध झाले. गेय, भावोत्कट, सामान्यांच्या सुखदुःखाशी समरस होणारी, सहजसुगम अशी त्यांची कविता आहे. त्यामुळे रविकिरण मंडळातील सर्वांपेक्षा अधिक लोकप्रियता त्यांना मिळाली.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here