ॐ अंजनेयाय विद्महे
वायुपुत्राय धीमहि
तन्नो हनुमतः प्रचोदयात।
यत्र यत्र रघुनाथकीर्तनम्
तत्र तत्र कृत मस्तकअञ्जलिम्
बाष्पावरिपरिपूर्णलोचनम्
मरुतिम् नमंश्च रक्षसान्तकम्
जेथे जेथे श्री रामाचे गुणगान गायिले जाते तेथे तेथे हात जोडून उभ्या असलेल्या, आनंदाने व भक्तीने ज्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहत आहेत अशा, राक्षसांचा नाश करणाऱ्या मारुतीला मी वंदन करतो. – संत तुलसीदास (रामचरितमानस)
जहाँ जहाँ श्रीरामजी के गुणगान गाए जाते है, वहाँ वहाँ हाथ जोडके खड़े रहके, आनंदसे और भक्तिरूप में तल्लीन होके जिसके नयनों से अश्रु बहते है, जो राक्षसों का नाश करता है ऐसे श्री हनुमानजी को मैं वंदन करता हूँ। – संत तुलसीदास (रामचरितमानस)
श्री हनुमानाचा जन्म चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच ज्या महिन्यात वसंत ऋतूचे आगमन होते, तसेच श्रीरामाच्या जन्मानंतर अर्थात रामनवमीनंतर पाचव्या दिवशी येतो.
श्रीरामाच्या जन्मभूमीत, अयोध्येत, श्री हनुमानाचा जन्म सहा महिन्यांनी म्हणजेच हेमंत ऋतूतील कार्तिक पौर्णिमेला साजरा करतात.
श्री हनुमानजी का जन्म चैत्र महीने की शुक्ल पक्ष के पौर्णिमा के दिन अर्थात जिस महीने से वसंत ऋतु का आरंभ होता है और श्रीरामजी के जन्मदिवस पश्चात पांच दिन बाद होता है।
श्रीरामजी के जन्मभूमि अयोध्या में, श्री हनुमानजी का जन्म रामनवमी के छह महीनों बाद अर्थात हेमंत ऋतु के कार्तिक पूर्णिमा के दिन मनाया जाता है।