– सविता टिळक / कविता /
काल बसले होते निवांत।
अवचित आलास तू दारात।
कधीची लांबलेली तुझी भेट।
आनंद मावेना गगनात।
म्हटले, आलास आता रहा मुक्कामास।
आसुसला जीव तुझ्या सहवासास।
तुझ्या असण्याने मन पावेल समाधानास़।
लाभेल शांतता त्रासल्या जीवास।
म्हणालास तू, कसा स्थिरावू सांग?
नसता सोबत्यांचा संग।
तुम्ही माणसांनी बांधला चंग।
‘प्रगती’साठी पर्यावरणाचा केला भंग।
मी म्हटले नको बोलू असे लागते जीवास।
वाटले होते तुझ्यासंगे करु भज्यांचा बेत खास।
म्हणालास विसरा वडे, भजी खासे।
बघा पिण्यास पाणी तरी मिळेल का पुरेसे।
नाही झालात जर जागे आता।
समतोल ढासळेल पुरता।
तरसाल कोसळणाऱ्या सरींकरता।
मग काय उरेल मागे, पुढच्या पिढीकरता।
Advertisement