वेडाचा झटका

0
15
Preshit

लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प

आलोक आणि सॅन्ड्राला स्पेस अकॅडेमीमध्ये येऊन आता तीन वर्ष झाली होती आणि त्याचबरोबर त्यांची चेंगबरोबर मैत्री घट्ट होत होती. त्यामुळे त्या तिघांना एकमेकांबद्दल आदर, आणि एकमेकांच्या सहवासात राहून चर्चा करण्यात गंमत वाटे.

एका संध्याकाळी त्यांच्या होस्टेलच्या सभागृहात सोशल प्रोग्रॅम होता. सॅन्ड्राने अलोकला त्या प्रोग्राममध्ये येण्यास सांगितले. प्रथम त्याने खूप कारणं दिली, की रात्रीचा मला माझा खूप अभ्यास असतो आणि एक चांगला वेळ पण असतो टीमउळे गर्दी, जागरण वगैरे या भानगडी नकोत. पण सॅन्ड्राने शेवटी आलोकची मनधरणी केली आणि आलोक तयार झाला.

त्या सोशल प्रोग्राममध्ये सर्व काही मुलं मुली जुन्या गाण्यावर नाचत होते, काही जेवणामध्ये गुंग होते. सॅन्ड्रा आणि आलोकही त्यांच्या मित्र मैत्रिणींबरोबर नाचण्यात गुंग असताना सॅन्ड्राने आलोकला सांगितले की प्रसाधन गृहात जाऊन येते. आलोकही तिच्याबरोबर जाऊन बाहेर वाट बघत उभा राहिला. बऱ्याच वेळाने सॅन्ड्रा बाहेर आली आणि आलोकला तिथे न पाहता त्या संपूर्ण सभागृहात त्याचा शोध घेऊ लागली. तिच्या मैत्रिणीला म्हणजे जेनीला जेव्हा तिने आलोकबद्दल विचारलं तेव्हा ती म्हणाली की, तो बागेच्या दिशेने कुठेतरी गेला.

सॅन्ड्रा त्या बागेमध्ये आलोकला शोधायला गेली. पण संपूर्ण बाग शोधूनसुद्धा आलोक तिला दिसला नाही. शेवटी बागेच्या टोकाला तिला माणसाची आकृती जमिनीवर पडलेली दिसली. ती आलोकची आहे हे तिने ओळखलं. त्याच्याजवळ जाताच तिला असं आढळून आलं की आलोक वेगळ्याच भाषेत काहीतरी हळूहळू पुटपुटत होता. वेड्याचा झटका लागल्यासारखं वागत होता. आलोक जेव्हा शुद्धीवर आला त्यानंतर हा घडलेला प्रकार त्याला लक्षात नव्हता म्हणून तिने त्याला त्याबद्दल न विचारता चेंगला याबाबद्दल सांगितले.

चेंग म्हणाला की येत्या सुट्टीत मी आलोकच्या घरी जाऊन याच्या डॉक्टरांना म्हणजे डॉ. साळुंखे याना भेटतो आणि विचारतो याच्याबद्दल. आलोक आणि चेंग दोघेही सुट्टीमध्ये वाराणसीला आले. आलोकने चेंगला संपूर्ण वाराणसीची सफर करवून आणली. त्यानंतर डॉ. साळुंखे यांची भेट करून दिली. हस्तांदोलन करताना डॉ. साळुंखे यांनी चेंगच्या हातात एक चिट्ठी दिली. त्यात त्याला एकटे एका ठिकाणी येऊन भेटण्यास सांगितले होते. चेंग आणि डॉ. साळुंखे ठरल्याप्रमाणे एका हॉटेलमध्ये भेटतात आणि नंतर चेंगला सर्व गोष्टीचा उलगडा होतो. आलोक दूर स्पेस अकॅडेमीमध्ये असल्याने डॉ. साळुंख्यांना त्याच्यावर काही प्रयोग करता येत नाही याची खंत वाटते. त्यावर चेंग म्हणाला की मला सांगत जा स्पेस अकॅडेमीमध्ये गेल्यावर मी प्रयोग कारेन आणि रिपोर्ट तुम्हाला देत राहेन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here