तुला पाहते रे तुला पाहते

0
144
Jagachya_Pathivar

गीत : ग. दि. माडगूळकर
संगीत : सुधीर फडके
स्वर : आशा भोसले

तुला पाहते रे, तुला पाहते
तुझी मूर्त माझ्या उरी राहते रे
तुला पाहते रे, तुला पाहते
जरी आंधळी मी तुला पाहते ।।धृ।।

तुझ्या संगतीचा जीवा ध्यास लागे
तुझ्या हासण्याने मनी प्रीत जागे
तुझ्या गायने मी सुखी न्हाहते रे
तुला पाहते रे, तुला पाहते ।।१।।

किती भाग्य या घोर अंधेपणीही
दिसे स्वप्न झोपेत, जागेपणीही
उणे लोचनांचे सुखी साहते रे
तुला पाहते रे, तुला पाहते ।।२।।

कधी भक्त का पाहतो ईश्वराला?
नदी न्याहळी का कधी सागराला?
तिच्यासारखी मी सदा वाहते रे
तुला पाहते रे, तुला पाहते ।।३।।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here