लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
चेंगच्या प्रयोग समजून घेतल्यानंतर सॅन्ड्रा आलोकबरोबर त्याच्याच खोलीत होती आणि चेंग आपल्या खोलीत काम करायला गेला होता. झालेला सर्व प्रकार कसा अनपेक्षित होता हे आलोक सॅन्ड्राला सांगत होता.
सकाळी नाश्ता करायला तुझी वाट बघत होते तर तू आला नाहीस, रात्री जागरण झालं असणार म्हणून इतका वेळ झोपला होतास. सॅन्ड्राने आलोकला सहज विचारले. आलोक खुलासा करायचा प्रयत्न करत होता. आलोक म्हणाला, की त्याच्या स्वप्नात सॅन्ड्रा आणि चेंग आले होते. सॅन्ड्राने त्याला सँडविच आणि चेंगने कॉफी बनवू दिली होती. स्वप्नात मी खात बसलो होतो आणि जाग आली तर बघतो तर मी खरच डायनिंग टेबलवर खात बसलो होतो. मला काही कळेच ना.
सॅन्ड्रा म्हणाली, या स्वप्नाला अनुसरून तू अजून एक स्वप्न बघितलं असणार जे मानसशास्त्राच्या आधारावर असू शकेल. हे ऐकल्यावर आलोक चकित झाला. हिला कसं कळलं की या स्वप्नाआधी मी अजून एक स्वप्न बघितलं होतं. सॅन्ड्रा म्हणाली, मी आपलं मानसशास्त्राच्या आधारावर बोलत आहे. खरं काय ते तुला माहीत. तुला काही सांगायचं असल्यास जरूर सांगू शकतोस.
आलोक जरा कावराबावरा झाला. आपल्या स्वप्नाबद्दल हिला सांगायचं का याचा तो विचार करू लागला आणि काही वेळानंतर सॅन्ड्राला त्या स्वप्नाबद्दल सांगायला लागला. सॅन्ड्राने आलोकच्या नकळत आपल्या मनगटावरील घडाळ्याचे एक बटण दाबले आणि चेंगच्या कॉम्पुटरवर सिग्नल गेला. आता चेंग सॅन्ड्रा आणि आलोकमधील संभाषण नीट ऐकू शकत होता.
आलोक आपल्या स्वप्नाबद्दल सांगू लागला – त्याला अशी स्वप्नं क्वचित पडायची.. आणि प्रत्येकवेळी त्या स्वप्नातील व्यक्तिरेखा आणि काही गोष्टी स्पष्ट व्हायच्या. पहिल्यांदा मला असे स्वप्नं लहानपणी पडले जेव्हा माझी निवड W T S साठी झाली. त्यावेळी तर काहीच काळात नव्हते. एका यानात माणसांची शरीरे इकडे तिकडे पसरली आहेत. त्यांच्या शरीरातून प्राण निघून गेला आहे. तिथे एक बाई ‘मारु’ आणि पुरुष ‘तारु’ एकमेकांशी या माणसांबद्दल बोलत आहेत. माझ्याकडे कसल्यातरी खुणा करत आहेत. मारु अधूनमधून हुंदके देते. वेळ फार थोडा आहे. तो संपला कि आपणही या माणसांप्रमाणे मारणार या गोष्टीने मारु रडत आहे. तारु मारुनी समजूत घालत आहे आणि त्याचबरोबर मलादेखील काहीतरी समजावून सांगतोय. परंतु माझ्याशी बोलताना मायक्रोफोनचा वापर करतोय. पण या परिस्थितीत मी कोण? कुठे आहे मी? हे कळत नाही. सायक्लॉप्स पाहून आल्यावर मला हे स्वप्न अजूनच स्पष्ट दिसायला लागलं. पण या स्वप्नाचं उत्तर सॅन्ड्रा आणि चेंग यांच्याकडे नव्हतं.