लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
१९५७ नंतर स्पुटनिक यान अंतराळात सोडलं त्यावेळी स्पेस अकॅडेमीची स्थापना करण्यात आली होती. २०३२ साली स्पेसस्टेशनसारख्या लहान लहान वसाहती अंतराळात अस्तित्वात झाल्या होत्या. दरवर्षी सोळा वर्षांचे शंभर विद्यार्थी या अकॅडमीत प्रवेश मिळवू शकत होते. W T S तर्फे डोरोथीने केलेल्या प्रयत्नांनी भारतातून अलोक आणि न्यूझीलंडमधून सॅन्ड्रा यांना स्पेस अकॅडेमीमध्ये प्रवेश मिळाला.
स्पेस अकॅडेमीमध्ये अलोकला सॅन्ड्रासोबत अजून एका मित्राची ओळख झाली. त्याचे नाव होते हुआन चेंग. हुआन चेंगची ओळख – हुआन चेंग त्या दोघांपेक्षा एकावर्षाने मोठा होता. आता आलोक आणि सॅन्ड्राला पाच वर्ष सतत स्पेस अकॅडमीच्या हॉस्टेलमध्ये राहायला लागणार होतं. हॉस्टेलमध्ये दुसऱ्यावर्षीची मुले पहिल्या वर्षी प्रवेश मिळालेल्या मुलामुलींची खोड काढत, रॅगिंग करत आणि हुआन चँग हा त्या रॅगिंग कमिटीचा अध्यक्ष होता.
हुआन चेंगने जेव्हा अलोकला सर्वप्रथम पाहिले तेव्हा त्याला आलोकबद्द्ल, त्याच्या शरीरयष्टीची सहानुभूती आली. तरी त्याचे रॅगिंग करायचेच असे त्याने ठरविले. आलोकने आपली ओळख करून देतानाच चेंगचे मन जिंकलेले असते, तरी तो चेंगने दिलेल्या ३ अवघड प्रश्नांची उत्तरे बरोबर देतो आणि रॅगिंगपासून आपली सुटका करून घेतो.
त्यानंतर हुआन चेंग, आलोक आणि सॅन्ड्रा चांगले मित्र बनतात आणि त्या होस्टेलबाहेर असलेल्या समुद्रकाठच्या सी फूड ग्रोटो मध्ये जेवायला जातात, तिथल्याच एका गावात छोटंसं नाटक बघतात.