सर पीटर

0
21
Preshit

लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प

पुढच्या संशोधनाला लागलेल्या आलोक आणि सॅन्ड्राने ठरवले होते की दर शनिवारी किंवा रविवारी भेटायचे. परंतु आलोकला ६० दिवसांची मुदत मिळाल्याने सॅन्ड्रा आलोकला भेटायला यायची. यावेळेस आलोकने स्वतः सॅन्ड्राला फोन करून तिच्याकडे येण्याचा म्हणजे सॅनटा बार्बराला येऊन भेटण्याची ईच्छा व्यक्त केली होती. कारणच तसे होते. जॉन प्रिंगलचे सहकारी डॉ. पीटर लॉरी यांचं वास्तव्य तिथेच होतं आणि सॅन्ड्रासुद्धा त्यांना चांगली ओळखत होती.

डॉ. पीटर लॉरी यांचा ९० वा जन्मदिवस साजरा केला जात होता आणि त्यात आलोक आणि सॅन्ड्रा हजार होते. सॅन्ड्राने आलोकची ओळख त्यांच्याशी करून दिली. ते स्वभावणारे मोकळे आणि रंगेल होते. त्यांचं चरित्र आणि संशोधन कार्य आलोकला माहित होतं आणि त्या गोष्टीचा आलोकला त्यांच्याबद्दल आदर होता.

आलोक आणि डॉ. पीटर यांच्यामध्ये संभाषण झालं. डॉ. पीटर आलोकला त्याच्या प्रश्नांची उत्तरे क्रिकेटच्या खेळाप्रमाणे समजावून देत होते. आलोकने जेव्हा त्यांच्या कारकिर्दीत घडलेल्या अनेक घटनांबद्दल विचारू लागला तसे ते गंभीर होत गेले. आलोकने विचारले, “तुमचा असा कोणता एक सहकारी होता का जो तुम्हाला अर्धवट सोडून गेला?”

आलोकच्या या प्रश्नाने डॉ. पीटर गंभीर मुद्रा करून त्याच्याकडे पाहत म्हणाले, “हो… माझ्याच वयाचा शास्त्रज्ञ होता, आमच्या दोघांचं संशोधन चालू होतं. एका रात्री मला फोन आला. इतके दिवस असाध्य गोष्ट सध्या झाली असं त्याने सांगितलं आणि मला ती सांगायला येणार तितक्यात त्याचा दुर्दैवी अपघात झाला.”

आलोकने विचारलं, त्यांचं नाव?

डॉ. पीटर म्हणाले, “जॉन प्रिंगल”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here