लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
जॉनची ड्युटी सुरु झाली होती. काही कागदपत्रे त्याने कपाटातून बाहेर काढले आणि त्यातील कोड कॉम्प्युटर कॉम्पुटरमध्ये टाईप केला. त्या कोडमध्ये काही अंक आणि अक्षरं होती. जसा त्याने तो कोड दिला तसं कॉम्पुटरवर त्याचं स्वागत करण्यात आलं आणि जॉनने पुढील कामास सुरुवात केली. प्रकल्प – शेजाऱ्यांचा शोध.
उर्वरित सर्व दिशांवर जॉनने आपला शोध केला होता आता फक्त एक पर्याय उरला होता. जॉनने निवडलेल्या दिशेत एक तारा होता gk५ त्यावर काम करण्यास जॉनने कॉम्प्युटरला संकेत दिले. संकेत मिळाल्याने त्या टोवनमधील सर्व दुर्बिणी एका विशिष्ट दिशेला बघायला लागल्या. दुर्बिणींची अनपेक्षित हालचाल पाहून गेटवरील मॅकार्थीला संशय आला. त्याने त्वरित जॉनला फोनकरून सांगितले की टाऊनमधील दुर्बिणी आपल्या दिशा बदलत आहेत. मॅकार्थीच्या या नाक खुपसण्याच्या बाबतीत जॉनला त्याचा राग आला पण व्यक्त न करता जॉनने मॅकार्थीला सांगितले की, काही सुरक्षा कारणांमुळे मला पँटागॉन कडून आदेश आले आहेत. पँटागॉनचे नाव आल्यावर मॅकार्थी पुढे काही बोलला नाही. जॉनने आपले संशोधन चालू केले.
जॉन नंतर बॅण्डविड्थ, वेव्हलेन्थ पुढे मागे कमी जास्त करून आपले संशोधन करत होता. त्यानुसार काही वेळानंतर टीव्हीच्या पडद्यावर एक चित्र उमटले. त्यावरील लहरींची लांबी २१ सें.मी. होती हे कळताच जॉनला आनंद झाला. पण जेव्हा हळूहळू त्या लहरी गणिताच्या आधारे वाढत गेल्यावर जॉनला खात्री पटली की पृथ्वीबाहेरील जीवसृष्टीला या गणिताबद्दल कल्पना आहे म्हणून असे संकेत आपल्याला मिळत आहेत.
आपण या संदेशाला उत्तर पाठवावे का? कारण आपण कारत असलेले संशोधन हे अमान्य आहे. या शोधाबद्दल कुणालाच याची माहिती नाही आणि याची सर्वाना कल्पना मिळाली तर आपली नोकरी जाऊ शकते आणि खूप मोठी शिक्षाही होऊ शकते. तरी खूप विचार करून जॉनने त्याच भाषेत एक प्रतिसादात्मक संदेश तयार केला. पीटरशी विचारविनिमय न करता असा संदेश पाठवणे कितपत योग्य आहे? त्याची संमती असेल का? या सर्व विचारातून जॉनने कॉम्प्युटरला आज्ञा दिली “संदेश पाठव”.