लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
चंद्राची सफर करून आल्यानंतर, W T S कडून सुधाकरला तिथल्या निरीक्षिका डोरोथी यांचा फोन आला. आलोकबद्दल डोरोथाला सुधाकरशी चर्चा करायची असते. त्यासाठी ती त्यांना W T S मध्ये आलोकच्या शिक्षकांबरोबर म्हणजे मिश्राजी यांना सुद्धा बोलावण्यास सांगते.
मिश्राजी आणि सुधाकर दोघेही W T S मध्ये पोहोचतात. तिथे त्यांचे स्वागत W T S चे संचालक मनमोहन सिंह करतात. डोरोथी सुधाकरला अलोकबद्दल व त्याच्या विलक्षण बुद्धीबद्दल प्रश्न विचारते. सुधाकर डोरोथीला आलोकबद्दल त्याच्या जन्माबद्दल सर्व सांगतो, तो त्यांना कुठे कसा भेटला, तो दत्तक मुलगा आहे हेही सांगितले.
अलोकच्या विलक्षण बुद्धीचा उपयोग आपल्याला करायला हवा त्यासाठी आपण त्याला स्पेस अकॅडेमिमध्ये दाखल करून घ्यायला हवे. W T S ची साथ असल्यावर अलोकला स्पेस अकॅडेमीमध्ये प्रवेश मिळू शकतो.
त्यानंतर डोरोथीने डॉ. साळुंखे यांच्याशी बोलण्याचा प्रस्ताव मांडला. त्यांच्याशीसुद्धा बोलणे झाले. डॉ. साळुंखे म्हणाले की, अलोक एकलकोंडा असला तरी बुद्धिवान आहे. त्याच्याजवळ त्याच्याशी बोलायला, खेळायला त्याच्या बुद्धीच्या क्षमतेचं असणारं हवं.
डोरोथीने सुधाकरला सांगितले की जेव्हा अलोक चंद्राच्या सफरीवर होता तेव्हा तो एकटा नव्हता त्याच्यासोबत सॅन्ड्रा नावाची मुलगी होती जी न्यूझीलंड या देशातून आलेली होती. W T S चे संचालक मनमोहन सिंग यांच्याशी बोलून आपण आलोक आणि सॅन्ड्रा यांची भेट घडवून आणू.