मन पाहतां सत्य हे मृत्युभूमी ।
जितां बोलती सर्वही जीव मी मी ।।
चिरंजीव हे सर्वही मानिताती ।
अकस्मात सांडूनियां सर्व जाती ।।१५।।
मी अमर, मी अजिंक्य, अशी या ‘मी’ ने जिवंत असताना कितीही बढाई मारली तरी अचानक, नकळतपणे त्या जीवाला जावेच लागते. ‘मी’ चा अहंकार किती खोटा आहे हे प्रत्येकाने समजणे आवश्यक आहे.
Advertisement