सानभूल

0
489
  • मानसी बोडस / कविता /

हळुवार पाकळी उमलू द्यावी,
मुकी कळी खुडू, न-घ्यावी ।
चुंबून गुलाबाचे ओठ,
तिच्या गालावरती लाली यावी ।

मुक्त मौक्तिकांची उधळण व्हावी,
जणू अशी ती हसावी ।
अन हात हाती घेता तिचा ,
गूढ खळी गालावर यावी ।

गर्द राई परी कुंद केसात,
मोगरीची वेणी माळावी ।
शय्येवरती नसतानाही,
स्वप्नांतूनही तीच दिसावी ।

अरे मना, तिच्यामुळे जिंदगी
माझी अशी बहरावी,
ती असतां-नसतांनाही,
तिच्या मिठीत मनाला सानभूल पडावी ।।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here