गायन, वादन व नृत्यातील वेळेच्या समान, नियमित गतीस लय म्हणतात. दोन मात्रांमधील समान अंतरास लय म्हणतात.
लयीचे मुख्य ३ प्रकार :
विलंबित लय : अतिशय संथ गतीने चालणारी लय, ज्यामध्ये दोन मात्रांमधील अंतर फार जास्त असते तेव्हा त्यास विलंबित लय म्हणतात.
मध्य लय : मध्य गतीने चालणारी लय जी विलंबितही नाही व द्रुतही नाही तेव्हा त्यास मध्य लय म्हणतात.
द्रुत लय : जलद गतीने चालणारी लय म्हणजेच द्रुत लय. ही लय मध्य लयीपेक्षा जास्त असते. साधारणपणे विलंबित लयीची दुगून म्हणजे मध्य लय आणि मध्य लयीची दुगून तसेच विलंबित लयीची चौगुन म्हणजे द्रुत लय असेही म्हणतात.
Advertisement