दररोजच्या जीवनामध्ये उपयुक्त ठरतील असे स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी विचार

0
423

अहंकार – माझ्यावर कोणीतरी अवलंबून आहे किंवा मी कुणाचे भले करू शकतो असा विचार करणेच दुबळेपणाचे लक्षण आहे. हाच अहंकार सर्व आसक्तीचा मूळ आहे आणि याच आसक्तीमुळे सर्व दुःखाची निर्मिती होते. 


आत्मविश्वास – आपले पहिले कर्तव्य हे आहे की, आपण आपलाच तिरस्कार करू नये. प्रगतीसाठी आधी आपण आपल्यावर व नंतर परमेश्वरावर विश्वास ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. 


आदर्श – प्रत्येक माणसाने आपले आदर्श घेऊन त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. जे आपण कधीच पूर्ण करू शकणार नाही असे दुसऱ्याचे आदर्श घेऊन चालण्यापेक्षा आपल्याच आदर्शाचे अनुसरण करावे. 


परोपकार – परोपकार हेच जीवन आहे. परोपकाराचे प्रत्येक कार्य, सहानुभूतीचा प्रत्येक विचार दुसऱ्याच्या मदतीसाठी केला गेला पाहिजे. जगावर उपकार करणे हे आपल्यावर उपकार करणे आहे.


प्रेम – प्रेम ही एक अशी वस्तू आहे जी समस्त दुःखांना दूर करते. प्रेम माणसामाणसांमध्ये भेदभाव करत नाही. प्रेमात कोणत्याच प्रकारची भीती राहत नाही. शुद्ध प्रेमाचा कोणताच उद्देश नसतो. त्याचा काही स्वार्थ नसतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here