आज सकाळी मरीन ड्राईव्हला जॉगिंगला गेलो असता काही गोष्टी समोर आल्या आणि त्या खूप विचित्र होत्या. Injections, Condoms, toothpaste, medicine bottle, plastic bags, कपड्याच्या चिंध्या अश्या बऱ्याच गोष्टी समोर आल्या आणि त्याही पाण्याच्या प्रवाहात वाहून तर काही समुद्राने रौद्र रूप दाखविल्याने बाहेर फेकलेला होता, आणि तो म्हणजे आपणच फेकलेला कचरा… ते निसर्गाने आपल्याला दिलेले सडेतोड उत्तर.
पाण्यात इतक्या अशा गोष्टी होत्या की ज्याने रोगराई सहजतेने पसरू शकते. विविध प्रकारच्या गोष्टी पाण्यात होत्या आणि त्याच पाण्यात आपण लहान मुलांना पाय बुडवायला पाठवतो आणि गणपती विसर्जनाच्या वेळी मोठी गर्दी त्या पाण्यात उभी असते… आणि हे सर्व ती BMC साफ करणार हे योग्य आहे का?… पाय बुडवायचे आहेत विसर्जनाला? आनंदाने पाण्यात उभं राहून बाप्पाला निरोप द्यायचा आहे? मग हे कुठेतरी थांबणं गरजेचं आहे आणि हे आपल्या पासून सुरवात करू हे मनात धोरण ठेवायला हवं म्हणजे इतरही काही बघून शिकले तर शिकले. आपण BMC ला दोष देतो.. जेवढी BMC जबाबदार त्याहून आपण जास्त जबाबदार आहोत असे वाटते.. आपल्या सारखा सामान्य माणूस हे सर्व स्वच्छ करू शकत नाही, पण मदतीचा हात असेल तर नक्कीच करू शकतो.
आज आपले आराध्य दैवत (गणपती) तिथेच विसर्जन केले जाते व आपले दुसरे आराध्य दैवत म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे तिथे स्मारक उभारले जाणार आहे आणि तेही अश्या पाण्यात होणार आहे.. हे तुम्हाला तरी पटत आहे का..???
आज महाराजांच्या पुतळ्याच्या उंची वरून वाद चालू आहेत की ती किती असावी ह्यावरून, अहो पण महाराजांनी ती उंची कधीच गाठली आहे तेही त्यांच्या कर्तृत्वाने. पण आज आपण आपलं कर्तृत्व कुठे खर्ची करतोय ते म्हणजे की त्याची उंची किती असेल ह्यात त्यापेक्षा ते स्मारक कसं स्वच्छ ठिकाणी उभं करता येईल आणि त्या समुद्राची स्वछता कशी करता येईल हे समजणे गरजेचे आहे, नाही तर असं होईल की स्मारक बांधलंय आणि आणि कडेला कचरा साचून राहिलाय आणि तो कचऱ्याचा तवंग मस्त लाटे बरोबर मजा घेतोय आणि आपण त्या नाल्यातून महाराजांचं स्मारक बघायला जातोय आणि त्या कचऱ्याच्या बरोबर महाराजांचा फोटो काढतोय हे चित्र नंतर अस सत्यात नको उतरायला.
आज एवढा अवाढव्य समुद्र ह्या गिरगांवला लाभला आहे पण आपण मज्जा करायला गोवा, अलिबाग, मुरुड जंजिरा येथे जातो.. कारण, आपल्याला स्वच्छ निसर्ग हवा असतो आणि आपण इथे अस्वच्छ करून तिथे घाण करायला जातो.. नुसते गिरगांवकरच नाही तर पूर्ण मुंबईच.. आणि आपण तिथे गेलो की तिथले चौपाटी किती स्वच्छ आहे हे कौतुक करतो… असं का?
काही मंडळांनी किंवा ट्रस्टनी एकत्र येऊन सामान्य जनतेस, एकत्र घेऊन हे स्वच्छतेचं कार्य केलं तर प्रत्येक जण त्या चौपाटीचा उपभोग घेईल आणि आपले आराध्य दैवत (गणपती) पण गावाला आनंदी जाऊन पुढल्या वर्षी लवकर येईल.. व महाराज पण दिमाखात उभे राहतील
पाण्यात राहणारे जीव हे पण एक त्या समुद्राच्या (नाल्याच्या) विळख्यात सापडलेले आपल्यासारखे प्राणी आहेत फक्त त्यांना हा त्रास जास्त सहन करावा लागतो हे नक्कीच. मासे त्यांची छोटी पिल्लं, कासव ह्यांसारखे इतर छोटे मोठे जलचर प्राणी ह्याचा भाग झाले आहेत आणि त्यात त्यांना आपला जीव पण गमवावा लागत आहे. कोळी बांधवाना सुद्धा या जलप्रदूषणा चा त्रास सहन करावा लागतो आणि तो त्रास त्यांच्या व्यवसायावर होत आहे.. त्याच्या जाळयात मासे कमी आणि कचरा हा जास्त प्रमाणात येतो हे मी स्वतः पाहिलेला आहे.
रेल्वेच्या बाजूला असलेला कचरा हे ही समुद्राच्या अस्वच्छतेचं एक कारण आहे, त्यादिवशी काही कारणासाठी ठाण्याच्या पुढे गेलो असता आजूबाजूला डोंगर हिरवळीने भरलेले होते खाली गटाराचे पाणी वाहत होते त्या डोंगरावर डुक्कर फिरत होती. पण तो डोंगर नैसर्गिक नसून कृत्रिम होता प्लास्टिक आणि इतर कचऱ्याचा ते बघून खूप किळसवाणी वाटलं. त्यात मी रेल्वेला दोषी ठरवतो कारण ज्यांनी तो कचरा तिथे ठेवला त्या लोकांना दुजोरा दिला ह्यासाठी.. आणि हे फक्त ठाण्याच्या पुढील गोष्ट नाही तर हे सर्वच रेल्वेच्या आजूबाजूच्या जागेची ही स्तिथी आहे. रेल्वेच्या आजूबाजूची बरीचशी जागा अस्वच्छ आहे त्यामुळे तिथे बरीच घाण साचून पाणी तुंबते आणि मग ते पाणी समुद्रात सोडले जाते आणि मग समुद्राला गरज म्हणून तो स्वतः ते बाहेर काढतो आणि मग BMC ते उचलायला येते हे चक्र असाच फिरतं राहणार. कुठेतरी आणि कधीतरी हे सर्व थांबायला हव. समुद्राच्या स्वच्छतेचा विचार करून काहीतरी पाऊल उचलायला हवं.
निसर्गाने भरभरून दिल आहे आपल्याला (झाडे, हवा, पाणी इ.) आज आपण त्याला काहीतरी द्यायची वेळ आहे तर आपण दोन पाऊल पुढे जाईला हवं. पाणी हा जीवनातील महत्वाचा घटक आहे, फक्त पिण्याचे नाही तर इतरही पाणी गरजेचे आहे. आज कितीही म्हणालो आपण की सर्व छान आणि सुंदर आहे पण ते आपण आपली जबाबदारी झटकून बोलत असतो कारण आपल दुसर मन एखादी चांगली गोष्ट करून देत नसते. ती करून देत नाही म्हणून ती छान आणि सुंदर म्हणण्याशिवाय पर्याय नसतो..
मेट्रो 3 प्रकल्प करण्याआधी सरकारने ह्या समस्या आधी सोडवणं गरजेचे होते… पण हे प्रकल्प नाही झाले तर राजकीय नेत्यांची पोटं कशी भरणार..? आज प्रत्येक व्यक्ती ऑफिस च्या कामात एवढा व्यस्त झाला आहे की तो स्वतःकडे नाही लक्ष देत, मग तो काय निसर्गाकडे लक्ष देणार. पण एखादा दिवस काढून सफाईचा कार्यक्रम राबवला तर आपणही निसर्गाला हातभार लावला असे होईल.. भूटानचा राजा मुलीचा किंवा मुलाचा जन्म झाला की हजारो झाडे लावतो मग आपण निदान 100 तरी लावावी असे निश्चित केले तर किती तरी मदत निसर्गाला होईल. म्हणजेच आपण त्याला देवाणघेवाण केल्या सारख बोलू शकतो… (उदा. जसे आपण देवाकडे काही मागतो आणि मग देव आपल्याला ती गोष्ट देतो आणि मग त्या बदल्यात आपण त्याला सोनं, चांदी, वस्त्र, प्रसाद देतो) पण हे देव नाही आपणच करतो आणि देव फक्त आपली इच्छाशक्ती वाढवतो आणि ती गोष्ट जी आपल्याला हवी असते ती तो करवतो आणि ती गोष्ट होते मग तीच इच्छाशक्ती अपण पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, आणि निसर्गाला मदतीसाठी वापरली तर कुठे बिघडल.आज भारतात करोडो लोकसंख्या आहे मग सर्वांची इच्छाशक्ती एकत्र झाली तर ?
विचार करा … ???
जेव्हा आपल्याला निसर्गाची गरज होती तेव्हा त्याने खूप भरभरून दिले, आज जेव्हा त्याला गरज आहे तेव्हा अपण दुर्लक्ष करतोय.. त्यादिवशी एक बातमी आली की समुद्राने 12 मेट्रिक टन कचरा बाहेर फेकला… आणि ते साफ करणारे 50 BMC चे कामगार होते… म्हणजे कचरा आपण करायचा आणि साफ ते 50 कामगार करणार … साफ करताना कामगारांची व्हिडीओ काढताना त्या काढणाऱ्या ला एकदा तरी विचार आला असेल का…? BMC ने पण ते साफ करायला नको होता… त्यांनी तेव्हा बोलायला हव होत की सामान्य जनतेस बोलवा आणि आमच्या बरोबर साफ करायला मदत करा अस स्पष्ट केलं असत तर BMC, सरकार, आणि सामान्य जनतेची अक्कल ठिकाणावर आली असती… प्लास्टिक बंद केलं हे उत्तमच झाल पण त्याच बरोबर गुटखा आणि तंबाखू ही बंद केला असत तर अजूनच बर झाल असत.. त्यामुळे स्वच्छता पण राहीली असती आणि अनेक जणांचे संसार पण वाचले असते असे बोलायला हरकत नाही.
आज पाण्याची किंमत फक्त शेतकरी वर्गाला आहे असं आज काल दिसून येत, पाणी कस साठून राहील आणि शेतीला कस उपयोगी पडेल ह्या गोष्टींचा विचार तेच करतात आपण फक्त त्यांनी पिकवलेल्या अन्नावर आहोतच मज्जा मारायला, आणि आता पर्यंत तेच तर करत आलोय आज तो शेतकरी गरीब आणि न शिकलेला असून एवढा विचार करतो तर आपण शिकलेले असून काय उपयोग… दुष्काळात राहून हे विचार मग AC मध्ये राहून आपले विचार कुठेतरी संकुचित झालेत हे खरं… आयत मिळालं की हे असं होतं..
स्वातंत्र्य मिळालं पण त्याची किंमत आपल्याला नाही.
पारतंत्र्य काय असतं हे आपण भोगलं नाही…
धन्य तो शेतकरी आणि ती भारतमाता आणि ही धरती ज्यांनी आपल्याला अजून सांभाळून ठेवलं आहे आणि जिवंत ठेवलं आहे.
माणसाची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत बदल घडणार नाही.
आज खऱ्या अर्थाने सागराला स्वातंत्र्य मिळणं गरजेचं आहे नाहीतर त्याची अशीच तळमळ होत राहील.
चला विचार करूया आणि तशी पाऊले उचलूया!
जय भारत!!