– योगिनी वैद्य / कविता /
कोणासाठी पावसात चिंब भिजणे हा आनंद
तर कोणासाठी कोरड्याने पावसाला न्याहाळणे हा आनंद
कोणासाठी उंच शिखरे चढून जाणे हा आनंद
तर कोणासाठी पायथ्यावरुनच शिखराची भव्यता पाहणे हा आनंद
कोणासाठी सतत काहीतरी नवीन करत राहणे हा आनंद
तर कोणासाठी जुन्यातलेच नाविन्य शोधणे हा आनंद
कोणासाठी उगवतीच्या सूर्याला नमन करणे हा आनंद
तर कोणासाठी मावळतीच्या सूर्यासमोर बसणे हा आनंद
कोणासाठी लोकांच्या सहवासात वेळ घालवणे हा आनंद
तर कोणासाठी स्वत:तच मश्गुल राहणे हा आनंद
गोष्टी त्याच पण प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन
कारण नेहमी आनंदाच्या शोधात असते प्रत्येकाचे मन