– मयुरी मंगेश खरात / कविता /
काहीतरी गल्लत होतेय
आपण काही तरी हरवतोय
परक्यातला आपलेपणा शोधताना
आपल्यांना परकं करतोय
नको आशा ठेवायला आपलेपणाची
जिथे भावनिक ओढच नाही
इतरांच्या भावना सांभाळताना
मात्र फसवणूक होतेय आपलेपणाची
रोजच्या आयुष्यात खूपच कमी जण आपले असतात
काही वेळा ते इतरांचेच असतात
मग अशा वेळी का अपेक्षा करावी
त्यांच्याकडून जे आपलेच नाहीत?
अपेक्षा करून दु:खी होण्याआधी
सत्य स्वीकारायला हवंय
आपलं कोण परकं कोण?
आतातरी उमगायला हवं…