परण / परन

0
81
Sahityakalp

वजनदार, खुल्या बोलांची लांबलचक समूह असलेली विशेषतः तिहाईने संपणारी रचना म्हणजे परण होय. पर्ण (पान) या शब्दाचे अपभृतरुप म्हणजे परण. ज्याप्रमाणे झाडाच्या पानाला मधोमध एक उभी मुख्य शीर व दोन्ही बाजूने आडव्या उप शीरा असतात त्याप्रमाणे ही रचना असल्याने याला परण असे म्हणतात.
परणचे प्रकार :
साथ परण
गत परण
बोल परण
स्तुती परण
ताल परण

परणमध्ये प्रामुख्याने धागेतीट, ताकेतीट, किडधेतीट, गदींगन इत्यादी बोल येतात.

ताल झपताल परण :

धागेतीट ताकेतीट । धागेदींs धागेतीट किडधेतीट ।
किडधेतीट कत्रकधि । कीटकत गदींगन धाती ।
धा कत्रकधि । कीटकत गदींगन धाती ।
धा कत्रकधि । कीटकत गदींगन धाती ।। धिं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here