पाऊलवाट

– मानसी बोडस / कविता

तिच्या वळणावळणावर होता तो भाळला
मोहक तिच्या अदांनी तो तिच्याकडे वळला

नाजूक इवल्या पात्यांनी मध्ये धरला अंतरपाट
खडकाळ खट्याळ लाजऱ्या, तिचे नाव होते पाऊलवाट

पावसामध्ये न्हाऊन ती ओलेतीच बसून राही
तिच्या अंगावरचे ओघळ तो मात्र टक लावून पाही

तिला पाहताना तिच्या सोबत तिच्याच चिखलात लोळत राही
पुनः पुन्हा तेच स्वप्न तिच्याचसोबत जगत राही
अनेक प्रवासातून अनेक प्रवासी कायम साथ कोणाचीच नाही

आजही तिच्याकडे वळून पाहण्याचा मोह त्याला सोडवत नाही
कोणी असो सोबत गाड्या, घोडे अथवा एकटाच जाई
तिच्याकडे पाहिले मात्र की तो रस्ता म्हणून उरतच नाही

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!
Exit mobile version