– मानसी बोडस / कविता /
संधिप्रकाश तू कवेत घेता
होतो अधिकच गहिरा,
डोळे मिटता साठवून घेते
आठवणींचा चेहरा।
नवी नवलाई सरूनी गेली,
अजूनही तू तसाच,
कधी घट्ट मिठी, हातात हात,
तर श्वास कधी श्वासात।
आज अचानक मागे वळता,
ओलावे कड डोळ्यांची,
इतकी कसली घाई तुला रे?
मला सोडूनि जाण्याची?!
इतकी कसली घाई तुला रे?
मला सोडूनि जाण्याची?!