- मानसी उपेंद्र वैद्य / कविता /
दिवस उगवती, दिवस सरती,
रात्रीचा तमही विरघळून जाई
कळेना जग हे चालले कुठे?
विचार करून मतीच कुंठे…
मनुष्याची कर्मे अन् निसर्गाची अवकृपा,
आता तरी वाचव आम्हाला आकाशातल्या बापा…
अनेक कुटुंबे रस्त्यावर आली,
होती नव्हती गंगाजळी आटून गेली…
निसर्गाच्या प्रकोपात घरेही उध्वस्त झाली,
शेतमळा, कलमांची चिखलमाती झाली…
उद्याचे काय? या प्रश्नाला उत्तर नाही,
कोणाकडे दाद मागावी कळत नाही…
तरीही मन खंबीर आहे
या साऱ्यातून बाहेर येण्याची खात्री आहे…
हे, मानवा अनेकदा भूल घालेल तुला निराशा,
पण पुनश्च ताठ मानेनं उभे राहण्यासाठी,
जिवंत ठेव तुझी आशा, जिवंत ठेव तुझी आशा…