मराठी भाषेतील विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक महामहोपाध्याय कै. डॉ. पांडुरंग वामन काणे. प्राचीन संस्कृत वाङ्मयाचा अभ्यास, सामाजिक अभिसरणाचे भान या दोन अगदी वेगळ्या वाटणाऱ्या गोष्टींमधून काण्यांनी ’धर्मशास्त्राचा पंचखंडात्मक इतिहास’ नावाचा ग्रंथ सिद्ध केला. १९४१ साली त्यांनी प्राच्यविद्येवरचा ग्रंथ लिहिला.१९४२ साली त्यांना ‘महामहोपाध्याय’ ही पदवी मिळाली. ‘हिस्टरी ऑफ संस्कृत पोएटिक्स’ हासुद्धा त्यांचा अजून एक महत्त्वाचा ग्रंथ. महाभारतरामायणकालीन समाजस्थिति (१९११) आणि धर्मशास्त्रविचार (१९३५) हे त्यांच्या महत्वाच्या मराठी ग्रंथांपैकी होत. त्यांचे प्राचीन भाषा, वाङ्मय, काव्य महाकाव्य, अलंकारशास्त्र यांचे प्रेम आणि कायदेविषयक जाण, तार्किक मांडणी, प्रथा आणि परंपरांचा कालानुरूप अर्थ लावण्याची क्षमता या आणि अशा शेकडो पैलूंचे एक विस्मयकारी मिश्रण पांडुरंगशास्त्रींच्या लेखनात झाले. खगोलविद्या, सांख्य, योग, तंत्र,पुराणे आणि मीमांसा या विषयांचा सखोल अभ्यास करून त्यांनी त्यावर भाष्य लिहिले. त्यांचे हे प्रकांड पांडित्य, हा साक्षेपी व्यासंग ही तैलबुद्धी आणि सखोल संशोधनाची आस पुढील कित्येक पिढ्यांपर्यंत झिरपली गेली.
संस्कृत भाषेला जगातील सर्व भाषांच्या जननीचे महत्त्व सांगून देणारे पांडुरंग वामन काणे
Advertisement