विनोदा इतकेच गंभीर लेखन आणि राजकारणा इतकेच समाजकारण पण सहजतेने हाताळणारे, मुलांचे मानसशास्त्र चांगले अवगत असणारे अत्रे भारतवर्षांतील एक महान नेते..
आचार्य अत्रे यांच्याच शब्दांत त्यांच्याबद्दल सांगायचे झाले, तर ‘गेल्या दहा हजार वर्षांत असा माणूस झाला नाही, पुढच्या दहा हजार वर्षांत असा माणूस होणार नाही.’ अशा या बहुयामी व्यक्तिमत्वाला त्रिवार प्रणाम…!
प्रल्हाद केशव अत्रे – Pralhad Keshav Atre – आचार्य प्र. के. अत्रे यांची संपूर्ण माहिती इथे वाचा.
- * सृष्टीसौंदर्य बघून का कुठं काव्य निर्माण होतात? कावळ्यांना देखील सपाटून सृष्टीसौंदर्य पाहायला मिळतं! म्हणून काय त्यांना कविता थोड्याच करता येतात?
- * पापी माणसानं दयेची पदर पसरावा आणि लाचार होऊन दुसऱ्याचे पाय धरावेत! पुण्याईला आपलं मस्तक कधीच नमवावं लागत नाही!
- * स्वातंत्र्याचं सुख लाभल्यावर गुलामगिरीच्या यातनांची कोणाला आठवण होईल?
* दुसरं लग्न करायला पहिल्या बायकोच्या मरणाचीच जरुरी नसते पुरुषांना!
* हिंदी महासागराचं पाणी खारट का आहे याचं कारण निराळं आहे असं वाटतं! आजपर्यंत या पुरुषांच्या हिंदुस्थानात ज्या कोट्यवधी स्त्रियांचे हालहाल झाले त्यांच्या अश्रूंनी हा महासागर भरला आहे म्हणूनच तो खारट आहे, असं नाही का वाटत तुम्हाला?
* आयुष्य हे जगून समजतं, नुसती पुस्तकं वाचून समजत नाही.
* पाठ फिरली की पुरुषांची नाती तुटतात पण दुनिया फिरली तरी स्त्रियांची माया तुटत नाही.
* लग्न करताना डोळे नीट उघडे ठेवावेत. पण लग्न लागल्यानंतर एकमेकांनी एकमेकांकडे काणाडोळाच करायला पाहिजे.
* बुद्धी आणि कविता म्हणजे काय वाण्याच्या दुकानामधला गूळ आणि साखऱ्या आहे का? की चार पैसे फेकले त्याच्या अंगावर की वाटेल त्या रस्त्यावरच्या गिऱ्हाईकाला तो विकत घेता येईल? या जगातली एकही मौल्यवान गोष्ट तुम्हाला पैशानं विकत घेता येणार नाही. ज्ञान, प्रेम, मैत्री, शील, निष्ठा, या गोष्टी विकत घ्यायला कुबेराची संपत्तीदेखील पांगळी पडेल.
* मातृत्व हे कधीही पापी नसतं! मातृत्व हे कधीही अपवित्र नसतं! मातृत्वाला पावित्र्याचा चिरंतन अमरपट्टा मिळाला आहे. जगाच्या आरंभापासून ते जगाच्या अंतापर्यंत माता ही मंगलच राहणार! मातेचं रक्षण करणं हे समाजाचं पहिलं कर्तव्य आहे! मग ती माता विवाहित असो आगर अविवाहित असो.
Advertisement
Sunder