वर्तमान

0
398

– मानसी उपेंद्र वैद्य / स्फुट लेखन /

वर्तमान.. भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा. भूतकाळातील आठवणी, एखादे वेळेस झालेल्या चुका याचे सावट नेहमीच वर्तमानावर पडत असते. ते सावट आपल्या वर्तमानाला किती झाकोळून द्यायचं हे आपण ठरवायचं.

मी मजेत आहे, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या मनाचा एक कोपरा भविष्याचा विचार नक्कीच, नकळतपणे करत असतो. मग खरंच आपण वर्तमानाचा आनंद घेतो का? आपल्या सभोवताली अनेक छोट्या, छोट्या गोष्टी असतात ज्या आपल्याला आनंद देऊन जातात. पक्ष्यांचे कूजन, फुलांचा सुगंध… एक ना अनेक.

म्हणतात ना सुख हे मानण्यावर असतं. म्हणूनच वाटतं की भविष्यात काय होणार याबाबत आपण अनभिज्ञ आहोत. आज सर्व सुखे जर जवळ असतील तर त्यांचा आनंद घेऊया. वर्तमानात जगूया, कारण उद्या भविष्यात हाच वर्तमान जगण्याची प्रेरणा, ताकद आणि उभारी देईल हे निश्चित.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here