मराठी भाषेतील लघुकथाकार, कादंबरी लेखक कै. नारायण हरी आपटे. त्यांनी त्यांच्या लेखनात मुख्यतः संसारसुखाचे मूलभूत सिद्धांत, वैवाहिक नीती, तरुण विद्यार्थ्यांचे आदर्श वर्तन अशा अनेक विषयांसंबंधी विवेचन केले आहे. त्यांनी सारेच लेखन बोधवादी भूमिकेतून केलेले आहे. त्यांची शैली प्रसादपूर्ण आणि प्रसन्न आहे.
नारायण हरी आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर प्रभातने ‘कुंकू’ चित्रपटाची निर्मिती करून जरठकुमारी विवाह ही त्या काळातील ज्वलंत समस्या चव्हाटय़ावर मांडली. ट्रेलरची पद्धत कुंकु चित्रपटापासुन सुरु झाली ट्रेलरमुळे सिनेप्रेक्षकांची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती.
सामाजिक कादंबऱ्या – न पटणारी गोष्ट (१९२३), सुखाचा मूलमंत्र (१९२४), पहाटेपूर्वींचा काळोख (१९२६), उमज पडेल तर (१९३९), एकटी (१९४५)
ऐतिहासिक कादंबऱ्या – अजिंक्यतारा (१९०९), संधिकाल (१९२२), लांच्छित चंद्रमा (१९२५) आणि रजपूतांचा भीष्म (१९४९) या विशेष उल्लेखनीय आहेत.
कथासंग्रह – आराम-विराम (१९३४) आणि बनारसी बोरे. यांशिवाय गृहसौख्य (१९३१), आयुष्याचा पाया (१९४६), कुर्यात् सदा मङ्गालम् (१९४९) अशा लघुकथा त्यांनी लिहिलेल्या आहेत.