दत्ताची पालखी

0
18
Shri Gurudev Datta

गीत : प्रवीण दवणे
संगीत : नंदू होनप
स्वर : अजित कडकडे

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः
गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।

निघालो घेऊन दत्ताची पालखी
आम्ही भाग्यवान आनंद निधान
झुलते हळूच दत्ताची पालखी
निघालो घेऊन दत्ताची पालखी ।।१।।

रत्नांची आरास साज मखमली
त्यावर सुगंधी फुले गोड ओली
झुळूक कोवळी चंदनासारखी
निघालो घेऊन दत्ताची पालखी ।।२।।

सात जन्मांची ही लाभली पुण्याई
म्हणून जाहलो पालखीचे भोई
शांतमाया मूर्ती पहाटे सारखी
निघालो घेऊन दत्ताची पालखी ।।३।।

वाट वळणाची जीवाला या ओढी
दिसते समोर नरसोबाची वाडी
डोळियात गंगा जाहली बोलकी
निघालो घेऊन दत्ताची पालखी ।।४।।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here