सविता टिळक / कविता /
एक मेघ ओथंबलेला।
अंगणी माझ्या विसावला।
एक नीलवर्णी नटखट कृष्णाचा।
अवखळ बरसणाऱ्या सरींचा।
एक जणू राधा सखीचा।
आर्त प्रेमाच्या वर्षावाचा।
एक मीरेच्या त्यागाचा।
हळूवार झरणाऱ्या धारांचा।
एक असे सावळ्या विठूचा।
भक्तीप्रेमाच्या जलौघाचा।
एक भासे रुद्रावताराचा।
कोसळणाऱ्या प्रपाताचा।
एक बने दूत प्रकाशाचा।
सांगे जीवन मेळा इंद्रधनुषी रंगांचा।